दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
मानवाच्या वैचारिक केंद्र क्षमतेला महत्व देत वेदना आणि संवेदना अंतर्गत दुःख मुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्म वाणीला व धम्माला जगातील १३५ देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
म्हणूनच चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शिवणपायली येथील बौद्ध उपासक-उपासिका यांच्या व्दारा युगप्रवर्तक-युगपुरुष-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मृति दिनानिमित्ताने २ फेब्रुवारी व ३ फेब्रुवारीला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्म विचारांना अनुसरून,”दोन दिवसीय धम्म परिषदेचे,आयोजन करण्यात आले आहे.
तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्म विचारांकडे अख्या जगातील नागरिक वळू लागले आहेत व धम्म अंगिकारु लागले आहेत.
महाथेरो भदंत शिलानंद हे मुळचे मौजा शिवणपायलीचे असल्याने त्यांच्या अनुशासन धम्म कार्यपध्दती नुसार तिथला समाज घडलेला आहे.शिवणपायलीच्या बौध्द समाज बांधवांनी धम्म विचारांना अनुसरून समाज उन्नतीचा सन्मार्ग अवलंबिले असल्याने धम्म विचार क्रांतीकडे त्यांच्या कार्याची दिशा वळलेली आहे.
उद्या सकाळी महाथेरो भदंत शिलानंद व भिख्खू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्म ध्वजारोहण होणार आहे तर दुपारी १२ वाजता विचारवंत प्रज्ञा राजूरवाडे धम्म परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.या परिषदेचे अध्यक्ष पी.एम.डांगे असणार आहेत.प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रेमकुमार खोब्रागडे,चंद्रमणी घोणमोडे,जिंदा भगत,प्रविण खोब्रागडे,जिवन बागडे,देवेश कांबळे,प्रशांत डांगे,किशोर अंबादे,जि.टी.खोब्रागडे,विकास खोब्रागडे,सिरपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशालीताई निकोडे,माजी प.स.सदस्या निर्मलाताई रामटेके,पोलिस पाटील महेश डेकाटे,रमेश राऊत,नागनाथ फुलझेले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
२ फेब्रुवारीला,”धम्म क्रांतीचे पाच सुत्रे व विश्वभुषण डॉबाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित समाज निर्मिती,या विषयाच्या अनुषंगाने दुपारी प्रबोधन सत्र पार पडणार आहे.सायंकाळी ७ वाजता सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार तुषार सुर्यवंशी व त्यांचा संच यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम सुरु होणार आहे.
३ फेब्रुवारीला धम्म फेरी,शिलग्रहण,परित्राणपाठ,भोजणदान,भिख्खू संघाची धम्म देशना,मंगलमैत्री,अशा प्रकारचे क्रमानुसार कार्यक्रम पार पडणार आहेत.क्रमानुसार होणाऱ्या धम्म पिठावर महाथेरो भदंत शिलानंद,महाथेरो भदंत ज्ञानज्योती यांच्यासह भिख्खू द्वारा धम्मवाणीचे तरंग चोहीकडे पोहोचणार आहे.
विदर्भाततील नागरिकांनी शिवणपायली येथे होणाऱ्या दोन दिवसीय धम्म परिषदेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन तेथील बौध्द उपासक व उपासिका यांनी केले आहे.