छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
श्री साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथील तब्बल 30 वर्षापासून सेवेत असलेले श्री. जी. एन. अवचट सर यांना 31 जानेवारी 2023 रोजी निरोप देण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक श्री. डी. व्ही. आकरे सर तर प्रमुख अतिथी म्हणून श्री पी. आर. आकरे सर सचिव श्री तुकाराम शिक्षण संस्था कढोली, डॉ. मोहन आकरे सर ,श्री आनंदरावजी आकरे सर ,प्राचार्य जीभकाटे सर ,लांडगे सर, व लोथे सर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वती यांच्या प्रतिमेची पूजा करून विधीवत सुरुवात करण्यात आली व त्यानंतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सत्कारमूर्ती अवचट सर यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू व कपडे घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जिभकाटे सर यांनी केले. त्यांनी श्री. अवचट सर यांच्या बहुआयामी व्यक्तित्वाचा सर्वांना परिचय करून दिला. त्यानंतर सर्व शिक्षकांनी सरांना सेवानिवृत्ती पर शुभेच्छा दिल्या. अवचट सर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील योगदान यावर सर्वांनी प्रकाश टाकला. शेवटी सर्वांना उत्तर देत सरांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांची सेवा करत राहण्याचे वचन आपल्या भाषणातून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता निंबेकर सर, निकुरे सर, करमरकर सर ,वैद्य सर ,साळवे सर , आकरे मॅडम ,नैताम सर, वाघे सर ,खोब्रागडे सर ,बोडणे सर, श्री. आर. आर. देशमुख, एम.पी. वटी , कल्पना आकरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती लाखे मॅडम तर आभार छन्ना खोब्रागडे सर यांनी व्यक्त केले.