दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
भारतीय संस्कृतीचा आधार ही मातृ शक्ती असून मातृ शक्तीच्या जागरूक शक्तीने संस्कृतीला टिकवून तिला बळकट करू शकतो.भारतीय संस्कृती बळकट करणाऱ्या या अशा मातृ समलनाचे आयोजन करण्यात यावे बहुसंख्येने महिला या कार्यक्रमाला आल्याबद्दल मी या क्षेत्राचा खासदार म्हणून आयोजक व उपस्थित मातृ शक्तींचे हार्दिक अभिनंदन करतो असं मत गडचिरोली चिमूर लोकसभेचे क्षेत्राचे खासदार श्री अशोक जी नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा यांनी व्यक्त केले. जग एक कुटुंब आहे ही उज्वल व भव्य दिव्य संस्कृती टिकवून ती येणाऱ्या पुढच्या अनेक पिढीपर्यंत रुजवण्याचं कार्य महिलेला करावयाचे आहे कारण भारतीय संस्कृतीमध्ये महिला ही कुटुंबाचा आधार आहे व कुटुंब संस्कारक्षम असणे ही सुद्धा मातृशक्ती महिलांची जबाबदारी आहे असं मत सौ शुभांगी ताई मेंढे संयोजिका विश्व मांगल्य सभा यांनी व्यक्त केले. “राजमाता जिजाऊ महिला बहुउद्देशीय संस्था गडचिरोली” चे अध्यक्ष सौ रेखाताई डोळस व “विश्व मांगल्य सभा” यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील केमिस्ट भवन येथे आयोजित “मातृ संमेलन” व “हळदी कुंकू” या मातृशक्तीच्या कार्यक्रमात ते उद्घाटक व अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तेजसाताई जोशी विदर्भ प्रांत संघटन मंत्री, व मृणालीताई वाघमारे अखिल भारतीय सेवा विभाग प्रमुख यांनीही उपस्थित मातृ शक्तींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखाताई डोळस,अध्यक्ष राजमाता जिजाऊ महिला बहुदेशीय संस्था, गडचिरोली व सूत्रसंचालन प्रकाश जी गेडाम प्रदेश संघटन ,सरचिटणीस, भाजपा ST मोर्चा, महाराष्ट्र यांनी केले तर आभार सौ.वर्षाताई शेडमाके, जिल्हा महामंत्री, भाजपा महिला मोर्चा, गडचिरोली यानी केले.
मंचावर खासदार अशोकजी नेते तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा,सौ.शुभांगीताई मेंढे दक्षिण भारत संयोजिका, तेजसाताई जोशी विदर्भ प्रांत संघटनमंत्री,सौ.मृणाली ताई वाघमारे अ.भा. सेवाविभाग प्रमुख, श्री प्रकाशजी गेडाम प्रदेश संघटन सरचिटणीस भाजपा एस.टी मोर्चा,महाराष्ट्र. सौ.रेखाताई डोळस प्रदेश सदस्या महिला आघाडी तथा रा.जि.म.बहु.संस्था अध्यक्षा,सौ रंणजीताताई कोडाप, मा.सभापती. श्री आशिषभाऊ पिपरे नगरसेवक, वर्षाताई शेडमाके,जिल्हा महामंत्री, महिला मोर्चा, सुंदराताई करकाडे, वच्छलाताई मुंनघाटे,तालुका संपर्क प्रमुख विलास पा. भांडेकर, विजय कुमरे ता. महामंत्री,पल्लवी कन्नाके, सौ, कुमरे ताई,श्री धोडरे जी,सौ रंजनाताई गेडाम, सौ.पिल्लारे ताई,वच्छलाबाई मुनघाटे,सौ,रुमणबाई ठाकरे उपसरपंच,सौ पठाणताई,सौ अलीताई, 500 च्या संख्येने महिला कार्यकर्त्या पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.