युवराज डोंगरे/खल्लार
खल्लार नजीकच्या उपराई येथे भिमा कोरेगाव विजय स्तंभास मानवंदना व सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम संयुक्तरित्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव खंडारे तसेच कार्यक्रमाचे प्रमूखपाहुणे सरपंच रियाजखा वारीसखा पठाण, सामाजिक न्याय विभाग श्री देवानंद दरोडे साहेब, युवराज डोंगरे त्याचप्रमाणे प्रमुख मार्गदर्शक श्री संजय घरडे सर, ॲड. संतोषजी कोल्हे, श्री. प्रकाशजी इंगळे सर, श्री संजय घरडे यांनी 1 जानेवारी 1818 भिमाकोरेगांव ची लढाई बाबात विश्लेषण करून पटवून दिले त्याच प्रमाणे श्री इंगळे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रकाश टाकण्यात आला त्याच प्रमाणे ॲड. कोल्हे साहेब यांनी सुद्धा ऐतिहासिक लढाई चे महत्व पटवून दिले व सामाजिक न्याय विभागाचे श्री दारोडे सर यंनी सावित्रीबाई फुले व विजयस्तंभाबाबत माहीती दिली
त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यष श्री राहुल सुरेशराव खंडारे यांनी व सूत्र संचालन कु. पल्लवी दामोदर मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन श्री भूषण सु.खंडारे यांनी केले व कार्यक्रमाला परिसरातील बरेच नागरिक उपस्थित होते.