दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यास एक आदर्श व्यक्ती घडविण्याच्या उद्देशाने “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” एक संस्कारक्षम उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे ज्ञानामृत दिले जाते. १ जानेवारी २०२१ पासून सुरू झालेल्या पर्वाची सांगता झाली. या दरम्यान ज्ञानेश्वरी ग्रंथावर आधारित विद्यार्थ्यांकरिता जो अभ्यासक्रम तयार केला त्यावर आधारित परीक्षा घेण्यात आली. ज्ञानेश्वरी ग्रंथातील १८ अध्यायांना अनुसरून १८ विद्यार्थ्यांचे नंबर काढण्यात आले. त्यांचा सन्मान अभिनेता वरुण भागवत व गायक अवधूत गांधी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. परीक्षेत पात्र ठरलेल्या पहिल्या २ विद्यार्थ्यांना उद्योजक नारायण गावडे यांच्याकडून सायकल व सार्थ ज्ञानेश्वरी, ३ व ४ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना विद्यालयाची माजी विद्यार्थीनी प्राजक्ता हरपळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वर्षभराचा सर्व शैक्षणिक फी तसेच शैक्षणिक साहित्य व सार्थ ज्ञानेश्वरी, ५ व ६ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रकाश काळे यांच्या वतीने दोन शालेय गणवेश, ७ ते ९ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्राजक्ता हरपळे यांच्याकडून स्कूल बॅग व सार्थ ज्ञानेश्वरी आणि १० ते १८ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सार्थ ज्ञानेश्वरी तसेच एकूण ११ उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना शिक्षिका हेमांगी कारंजकर यांच्या वतीने टिफीन डबा देऊन सन्मानित करण्यात आले.वर्षभर विद्यार्थ्यांना दर रविवारी ज्ञानेश्वरीच्या पाठाला जीवन जगण्याची कला शिकवणाऱ्या प्राध्यापक ह.भ.प.भागवत महाराज साळुंके, ह.भ.प.उमेश महाराज बागडे, ह.भ.प.सुभाष महाराज गेठे व ह.भ.प.श्रीधर घुंडरे यांचा व दर रविवारी उपक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.डॉ.नारायण महाराज जाधव, राजेश बादले, ॲड.विलास काटे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, सचिव अजित वडगांवकर, श्रीधर सरनाईक, सदस्य अनिल वडगांवकर, प्राजक्ता हरपळे, प्राचार्य दीपक मुंगसे आदी शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व उपस्थितांचे आभार प्राचार्य दिपक मुंगसे यांनी व्यक्त केले.